|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संगीतात भरपूर रियाज हीच गुरुकिल्ली

संगीतात भरपूर रियाज हीच गुरुकिल्ली 

प्रतिनिधी/ पणजी

भारतीय शास्त्राrय संगीतात नाव कमवण्यासाठी योग्य गुरुकडून मार्गदर्शन आणि भरपूर रियाज हीच गुरुकिल्ली आहे. गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुंच्याही एक पाऊल पुढे जावे आणि अभिमान वाटावा, असे कार्य करावे असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी केले.

युवा प्रतिभोत्सव या तरुणांसाठीच्या पहिल्या भारतीय शास्त्रीय संगीत संमेलनात दुसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात बासरीवादक सोनिक वेलिंगकर यांनी सुमधूर बासरीवादन केले. तबलापटू ऋषिकेश फडके यांनी त्यांना साथ दिली. सोनिक वेलिंगकर यांनी सकाळचा राग भरियाला निवडला होता. त्यानंतर त्यांनी मित्र पिलूत गत दादरा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले व उपस्थित सर्व गुरुजन गुणीजन आणि श्रोत्यांकडून वाहवा मिळवली.

त्यानंतर सोतिक वेलिंगकर यांचे गुरु पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी चर्चा झाली त्यात शिष्याच्या जडणघडणमधील बारकावे उपस्थितांना सांगितले. पं. छोटे रेहमत खा यांनी त्यांची मुलाखत घेतली.

पं. राजेंद्र कुलकर्णी विद्यार्थ्यांना विनामुल्य शिकवतात पण गुरुदक्षिणा म्हणून शिष्यांनी गुरुपेक्षा एक पाऊल पुढे जावे व गुरुंना अभिमान वाटावा असा नावलौकिक मिळवावा त्यासाठी भरपुर मेहनत घ्यावी असे ते म्हणाले.

संगीतात वेगवेगळी घराणी आहेत. तबल्यातही वेगवेगळी घराणी आहेत. पण बासरीत तशी घराणी नाहीत. संगीताची घराणी हीच बासरीची घराणी त्यामुळे वादन हे गायनाच्या समान असावे असे ते म्हणाले. हल्लीच्या काळात बासरीवादनात शास्त्रापेक्षा कलात्मकता आणि मनोरंजन अधिक असते त्यामुळे गायकाला किंवा वादकाला आपला ठराविक तबलापटू लागतो असे ते म्हणाले.

बासरीवादन काही दिग्गजांनी प्रचलित केले व या वादनाला भरपूर भवितव्य आहे असे सांगताना विद्यार्थ्यांनी बासरीवादनाबरोबर गाणे ऐकणेही चालू ठेवावे असा सल्ला त्यांनी दिला.

सिद्धेश डिचोलकर यांचे संवादिनी

दुसऱया सत्रात पद्मश्री तुळशीदास बोरकर यांचे शिष्य व कासारवर्णे पेडणे येथील व वास्को येथे स्थायिक झालेले सिद्धेश डिचोलकर यांचे संवादिनी वादन सादर झाले. अमर मोपकर यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली. यावेळी त्यांनी शुद्ध सारंग सादर केला. तराणा मुर्छनी सादर केला व शेवटी चांद हा माझा हसरा हे नाटय़गीत संवादीनीवर सादर केले. यावेळी गोमंतकीय प्रसिद्ध गायिका शिल्पा डुबळे परब यांनी त्यांची मुलाखत घेतली.

विविध प्रश्नांची उत्तरे देताना जलतरंग हे वाद्य आपल्याला आवडते व त्याचाही अभ्यास चालू असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला आपल्याला या क्षेत्रात आवड नव्हती पण आपले पहिले गुरु तथा मामा शरद मठकर यांनी शब्दशा मारून ही विद्या शिकवली व एक दिवस अचानक एक क्षण आला की याच क्षेत्रात भविष्या घडवावे असे आपल्याला वाटले असे ते म्हणाले.

मुंबईत राहून शिकताना येणाऱया अडचणी त्यांनी सांगितल्या आपल्याला गोव्यात राहून काम करायला आवडेल असे सांगताना यापुढे विद्यार्थ्यांना गोव्याबाहेर जाऊन शिकण्याची व भविष्या घडविण्याची पाळी येऊ नये म्हणून योग्य उपक्रम राबवण्यात यावेत असे ते म्हणाले.

आकाशवाणीवर सर्व वाद्यांना स्थान आहे, मात्र संवादिनी वादकाला फक्त साथ देण्यापुरताच मान दिला जातो. वैयक्तिक वादकाचा दर्जा द्यावा अशी मागणी यावेळी झाली. आपले गुरु पं. तुळशीदास बोरकर प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.

तिसऱया सत्रात महेश वझे यांचे तबला वादन झाले तसेच गुरु उल्हास वेलिंगकर यांचे यावेळी मार्गदर्शन झाले.

Related posts: