|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाची जाहीरात प्रसिद्ध

ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाची जाहीरात प्रसिद्ध 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सोमवारी धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्याजवळील ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लिलावासाठी 37,392 कोटी रूपये राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे.

ऍम्बी व्हॅली या विकसित गिरीशहर मालमत्तच्या लिलावाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी सहारा समुहाची याचिका सुप्रीम कोर्टाने गुरूवारी फेटाळून लावली होती. लिलाव प्रक्रिया थकित केली तर 1500 कोटी रूपये देण्याचे आश्वासन कसे पूर्ण कराल असा सवालही सुप्रीम कोर्टाने सहाराला विचारला होता. 7 सप्टेंबरपर्यंत 1500कोटी रूपये सेबी सहाराच्या बँक खात्यात जमा केल्यास याचिकेवर योग्य तो निर्णय नंतर दिला जाईल, असा न्या. दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले होते.

 

 

Related posts: