|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » जवानांनो बंदुका तोडा आणि काश्मिरींना मीठय़ा मारा :सामना

जवानांनो बंदुका तोडा आणि काश्मिरींना मीठय़ा मारा :सामना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची शिवसेनेने जोरदार खिल्ली उडवली आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी मोदींच्या भाषणाचा खोचक शैलित समाचार घेतला आहे. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करतो,असा चिमटा त्यांनी या अग्रलेखातून काढला आहे.

‘काशमिरमधील हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही नि:शब्द झाला असेल.‘ना गोली से…ना गाली से…समस्या का हल होगा काशमीरी लोगो गले लगाने से… हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते,असा चिमटा काढतानाच आता हा विचार अंमलात आणण्यासाठी एकच करा ‘सैनिकांनो ,बंदुका मोडा व काशमीरींना मिठय़ा मारा, असा जोरदार टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोदींना लगावला आहे.

 

 

Related posts: