|Sunday, February 23, 2020
You are here: Home » उद्योग » टाटा सन्स संपवणार सायरस मिस्त्री यांच्या एसपी ग्रुप सोबतचे संबंध

टाटा सन्स संपवणार सायरस मिस्त्री यांच्या एसपी ग्रुप सोबतचे संबंध 

मुंबई / वृत्तसंस्था :

टाटा समूह सायरस मिस्त्री यांच्या कंपनीसोबतचे सर्व संबंध लवकरच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात  आल्याचे बोलले जात आहे. यानूसार टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आपल्या समूहातील सर्व उपकंपन्यांना सायरस मिर्स्त्रीच्या शापोरजी पालोनजी ग्रुप (एसपीजी) सोबत असणारे सर्व व्यावसायिक संबंध खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. सायरस मिस्त्रीसह त्यांचे मोठे भाऊ शापूर मिस्त्रींच्या नेतृत्वाखालील 50 कंपन्यांना या निर्णयाचा थेट फटका बसणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 सूत्रानूसांर टाटा समूहातील सर्व कंपन्यांना ई-मेल द्वारे एसपी ग्रुप सोबत असणारे सर्व तऱहेची भागीदारी तसेच व्यवहार त्वरीत संपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 14 तारखेला प्राप्त झालेल्या या निर्देशान्वये सर्व कंपन्यांनी यावर कार्यवाही देखील सुरू केली आहे. विशेष म्हणजे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि मिस्त्राrंचे दाजी नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखालील व्होल्टास आणि ट्रेंट सारख्या छोटय़ा कंपन्यांनाही हे निर्देश देण्यात आले आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सायरस मिस्त्री आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपांच्या पार्श्वभूमिवर टाटा सन्सने हे पाउल उचलल्याचे समजते. एसपी ग्रुप कडे टाटा सन्समधील 18.4 टक्के हिस्सेदारी आहे.

 

Related posts: