|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » राज्यात शेतकऱयांची अद्याप कर्जमाफी झाली नाही : उद्धव ठाकरे

राज्यात शेतकऱयांची अद्याप कर्जमाफी झाली नाही : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकऱयांच्या कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र, राज्यातील शेतकऱयांची अद्याप कर्जमाफी झाली नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱयांची कर्जमाफी सरकारकडून अद्याप झाली नाही. ही शेतकऱयांची कर्जमाफी करताना सत्याला धरुन करण्यात यावी. तसेच कर्जमाफीनंतर सरकारने राज्यातील 89 लाख शेतकऱयांची यादी विधानसभेत जाहीर करावी. यामध्ये सर्व शेतकऱयांची नावे आणि त्यांचा पत्ता असावा, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव यांनी खासदार नाना पटोले यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, जनतेची ताकद मोठी आहे, त्यामुळे अहंकाराने वागू नका.

Related posts: