|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » अमेरिकी खनिज तेल भारताकडे रवाना

अमेरिकी खनिज तेल भारताकडे रवाना 

वॉशिंग्टन

 भारताला खनिज तेलाची निर्यात करण्यास बंदी घातल्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर प्रथमच पुढील महिन्यात भारतात अमेरिकन खनिज तेल पोहोचणार आहे. सप्टेंबरमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स मुल्याच्या खनिज तेलाचे पहिली शिपमेन्ट येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात ओडिशातील पॅरादिप बंदरात हे तेल पोहोचेल. बराक ओबामा यांनी बंदी उठविल्यानंतर भारतात खनिज तेल पोहोचण्यास दोन वर्षांचा कालावधी लागला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  विश्वासार्ह, दीर्घ कालीन ऊर्जेचा पुरवठा करण्यात येईल असे म्हटले आहे.

26 जून रोजी मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा झाली होती. आता भारतीय कंपन्या अमेरिकन कंपन्यांकडून तेल खरेदी करण्यास प्रारंभ करतील. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी चार दशलक्ष पिंप खनिज तेलाची मागणी केली आहे. यापूर्वी दक्षिण कोरिया, जपान आणि चीन या आशियातील देशानी अमेरिकेकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून तेल खरेदी करण्यात आल्याने हा व्यापार 2 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज असून भारत अमेरिकेसाठी सर्वात मोठा आयातदार देश बनेल. आखाती देशांनी खनिज तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने भारत अमेरिकेकडून आयात करत आहे.

Related posts: