|Sunday, August 18, 2019
You are here: Home » क्रिडा » आनंदसह कास्पारोव्हचीही निराशाजनक कामगिरी

आनंदसह कास्पारोव्हचीही निराशाजनक कामगिरी 

वृत्तसंस्था/ सेंट लुईस

येथील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिड गटात विश्वनाथन आनंदसह पुनरागमन करणाऱया गॅरी कास्पारोव्हची देखील अतिशय निराशाजनक कामगिरी झाली. या उभयतांना चक्क शेवटच्या आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. आनंदने रॅपिड सेक्शनच्या निर्णायक दिवशी दोन लढती बरोबरीत राखले व एका लढतीत पराभव स्वीकारला. दुसरीकडे, कास्पारोव्हने एक विजय मिळवला असला तरी दोन लढतीत त्याचा पराभव झाला. लेव्हॉन ऍरोनियनने अव्वलस्थानावर शिक्कामोर्तब केले. आनंदला दिवसभरातील पहिल्या दोन लढतीत क्वांग लियाम ली व फॅबिआनो कारुआना यांच्याविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले तर विश्व चॅम्पियनशिपमधील आव्हानवीर सर्जेई कर्जाकिनविरुद्ध धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.