|Sunday, August 18, 2019
You are here: Home » क्रिडा » दुहेरीत सानिया उपांत्य, बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत

दुहेरीत सानिया उपांत्य, बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ ओहिओ

भारताचे सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांनी येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या सहकाऱयांसमवेत दुहेरीत आगेकूच केली आहे.

महिला दुहेरीत चौथे मानांकन मिळालेल्या सानिया मिर्झा व चीनची शुआई पेंग यांनी बिगरमानांकित रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगू व रालुका ओलारु यांचा 6-3, 6-7 (1-7), 10-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पुरुष दुहेरीत सातवे मानांकन मिळालेल्या बोपण्णा व त्याचा क्रोएशियन साथीदार इव्हान डोडिग यांनी जुआन सेबॅस्टियन काबाल व फॅबिओ फॉगनिनी या कोलंबिया-इटालियन जोडीचा 5-7, 7-5, 10-8 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. संघर्षपूर्ण ठरलेली ही लढत पावणेदोन तास रंगली होती. त्यांची पुढील लढत द्वितीय मानांकित मार्सेलो मेलो व लुकास क्मयुबोट या जोडीशी होणार आहे. मार्सेलो-क्मयुबोट यांनी दिएगो श्वार्ट्झमन व मिशा व्हेरेव्ह यांचा 7-5, 6-2 असा पराभव केला.