|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाईन फेस्टिव्हल

वाईन फेस्टिव्हल 

प्रकारची वाईन./ बेळगाव :

बेळगावात आंतरराष्ट्रीय द्राक्षरस (वाईन) उत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी या उत्सवाचा उद्घाटन समारंभ रात्री उशीरा झाला. सायंकाळी 5 वाजता या वाईन फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार होते. मात्र, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे उशीरापर्यंत याठिकाणी आलेच नाहीत. यामुळे राज्य सरकारचे संसदीय कार्यदर्शी आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते रात्री उशीरा या फेस्टिव्हलचे उद्घाटन उरकण्यात आले.

रविवार दि. 20 पर्यंत मिलेनियम गार्डन येथे हा उत्सव राहणार असून यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्रासह युरोप खंडातील जुनी वाईन आणि ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि चिली देशातील नवीन वाईन उपलब्ध आहे. सुमारे 15 हून अधिक वाईनचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. गणेश हुक्केरी यांनी उद्घाटनपर भाषणात बोलतांना दाक्ष उत्पादनासाठी सरकारकडून शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय वाईन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या फेस्टिव्हलमुळे बेळगाव जिह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱयांना निश्चितच लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कर्नाटक दाक्षरस मंडळाचे अध्यक्ष रविंद्र शंकर मिर्जी,  व्यवस्थापक संचालक टी. सोमू यांच्यासह फलोत्पादन खात्याचे उपसंचालक दोडमनी आदी उपस्थित होते.