|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » मंकी हिलजवळ हुबळी एक्सप्रेसवर दरड कोसळली

मंकी हिलजवळ हुबळी एक्सप्रेसवर दरड कोसळली 

ऑनलाइन टीम / पिंपरी चिंचवड :

लोणाजवळ मंकी हिलमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या मार्गात विघ्न निर्माण झाले आहे. हुबळी एक्सप्रेसवर पहाटे साडे पाच ते सहाच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कर्जतमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरड कोसळल्याने हुबळी एक्सप्रेस एक तास उशिराने धावत आहे. दिलासादायक बाब म्हणजे इतर रेल्वेवर या घटनेचा परिणाम झालेला नाही. मात्र मुंबईहून निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस ही अतिवृष्टीमुळे काही काळ उशिरा धावत आहे.

 

Related posts: