|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » उद्या बँकांचा देशव्यापी बंद

उद्या बँकांचा देशव्यापी बंद 

ऑनलाइन टीम / मुंबई :

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात युनाटेड फोरम ऑफ बँक युनिन्सने मंगळवारी , 22 ऑकस्टला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे देशातील सर्व बँक मंगळवारी बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी, ग्राहकांना महत्त्वाची कामे सोमवारीच आटपण्याचे आवहाने बँक कर्मचाऱयांनी केले आहे.

फोरमचे निमंत्रक देलिदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि बँकांचे विलीनीकरण व एकत्रिकरणाला फोरमचा विरोध आहे. बँक कर्मचाऱयांच्या यांच्या मागण्यांवर फोमरच्या शिष्टमंडळाने इंडियन बँक असोसिएशनची 16 ऑगस्ट रोजी भेट घेतली. दरम्यान झालेल्या चर्चेत फोरमच्या एकाही मागणीवर निर्णय घेण्यात आयबीएने असमर्थता दर्शवत संप मागे घेण्याचे आवाहन केले. आयबीएच्या म्हणण्यानुसार फोरमने केलेल्या सर्व मागण्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असून त्यावर सरकारच निर्णय घेऊ शकते. परिणामी, आयबीएच्या आवाहनावा नकार देत फोरमे संपाचा निर्णय घेतला आहे.

 

Related posts: