|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

2008मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्नंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितला सर्वाच्च न्यायालयाने जामीर मंजूर केला आहे. गेल्या 9 वर्षांपासून तरूंगात असलेल्या पुरोहितांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रज्ञासिंहपाठोपाठ आता कर्नल पुरोहितही तुरूंगातून बाहेर येणार आहे.

दरम्यान गेल्या आठवडय़ात झालेल्या सुनावणीत पुरोहित यांच्यावतीनश प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली होती. ‘कर्नल पुरोहित गेल्या 9 वर्षांपासून तरूंगात आहेत. अद्याप त्यांच्याविरांधात आरोप निश्चित करण्यात आलेले नाही’याकडे साळवेंनी सुप्रिम कोर्टाचे लक्ष वेधले. तसेच पुरोहित यांच्यावरील ‘मोक्का’ही हटवण्यात आला आहे. असेही साळवेंनी निदर्शनास आणून दिले होते.