|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत प्रवासी संघातर्फे चाकरमान्यांचे स्वागत

कणकवलीत प्रवासी संघातर्फे चाकरमान्यांचे स्वागत 

कणकवली : कणकवली तालुका प्रवासी संघ व कणकवली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱया चाकरमानी, प्रवाशांचे येथील एस. एम. हायस्कूलनजीक स्वागत करण्यात आले. वाहनचालकांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड यांच्या हस्ते झाले.

तहसीलदार वैशाली माने, वाहतूक पोलीस प्रकाश गवस, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी मारुती जाधव, निवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र सावंत, प्रवासी संघाचे उपाध्यक्ष यशवंत राणे, कार्याध्यक्ष सुरेश पाटणकर, सचिव विद्याधर जोशी, खजिनदार रमेश आपटे, अशोक करंबेळकर, भास्कर गावडे, संदीप मेस्त्राr, डी. पी. तानवडे, अविनाश राणे, स्काऊट गाईड शिक्षिका श्रद्धा कदम, विद्यार्थिनी आदिती मालपेकर आदी उपस्थित होते.

माधुरी गायकवाड म्हणाल्या, कोकणात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त प्रवासाचा मोठा टप्पा गाठत मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून प्रवासी, चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. त्यांच्या स्वागताचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गायकवाड म्हणाल्या. यावेळी सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करणारे पत्रकही वाहनचालकांना देण्यात आले.

Related posts: