|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » सुनील जोशी बांगलादेश संघाचा गोलंदाज सल्लागार

सुनील जोशी बांगलादेश संघाचा गोलंदाज सल्लागार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशने माजी भारतीय फिरकीपटू सुनील जोशीची फिरकी सल्लागार म्हणून नियुक्ती केली. बांगलादेश क्रिकेट मंडळाने यापूर्वी फेबुवारीत हैदराबाद येथे संपन्न झालेल्या एकमेव कसोटीसाठी देखील सुनील जोशीशी संपर्क साधला होता. आता रविवारपासून ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरु होणाऱया मालिकेला चार-एक दिवसांचा कालावधी बाकी असताना जोशीला पाचारण करण्याचा निर्णय बांगलादेश मंडळाने जाहीर केला. जोशीने भारतीय संघातर्फे 15 कसोटी व 69 वनडे सामने खेळले आहेत.

सध्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आसामचे प्रशिक्षक या नात्याने कार्यरत असलेल्या जोशीने बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले. ‘बांगलादेश क्रिकेट मंडळाचा मी आभारी आहे आणि माझ्यासाठी ही उत्तम संधी असेल. बांगलादेशच्या फिरकीपटूंना घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेता यावा, यावर मी विशेष लक्ष केंद्रित करेन’, असे तो म्हणाला. मेहदी हसन व डावखुरा तैजूल इस्लाम हे दोन फिरकीपटू सध्याच्या बांगलादेश संघात कार्यरत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ अलीकडे उपखंडात बराच झगडत राहिला आहे. मात्र, कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नरसारखे दिग्गज खेळाडू खेळत असताना यजमान संघाने त्यांना सहजतेने घेणे अजिबात परवडणारे नसेल. जोशीने  त्याचा उल्लेख केला. ‘ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. मात्र, अलीकडे, बांगलादेश संघाने दणकेबाज कामगिरी साकारली, ही त्यांची जमेची बाजू ठरेल. बांगलादेशी खेळाडू मानसिकदृष्टय़ा आणखी कणखर व्हावेत, असा माझा

Related posts: