|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » रेल्वे मंडळ अध्यक्षपदी अश्वनी लोहानी

रेल्वे मंडळ अध्यक्षपदी अश्वनी लोहानी 

नवी दिल्ली

 एकाच सप्ताहात दोन वेळा रेल्वे अपघात झाल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी अश्वनी लोहानी यांना नियुक्त करण्यात आले आहे. अश्वनी लोहानी हे सध्या एअर इंडियाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोहानी यांनी यापूर्वी रेल्वेमध्ये काम करण्याचा अनुभव आहेत. फेअरी क्वीन एक्स्प्रेस ही जगातील सर्वात जुनी स्ट्रीम लोकोमोटिव्ह रेल्वे चालविण्याचा त्यांच्या नावे विश्वविक्रम आहे. लोहानी यांच्याकडे अभियांत्रिकीमध्ये चार पदव्या आहेत.

 

Related posts: