|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » महापालिका क्षेत्रांसाठी दारूबंदी नाही : सुप्रिम कोर्ट

महापालिका क्षेत्रांसाठी दारूबंदी नाही : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरातील दारूची दुकाने जर महापालिकेच्या अखत्यारित येत असतील, तर यापुढे त्यांच्यावर दारूबंदी नसेल असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्गांलगतची परवानाधरक दुकाने पुन्हा सुरू होण्याची मार्ग आता मोकळा झाला आहे.

महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामधील मृत्यू यांचे प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर 2016 रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला सुधारणा करून सुप्रीम कोर्टाने हा नवा निर्णय दिला आहे. दारूबंदीच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी राज्य सराकरने तात्काळ काही रस्ते स्थनिक प्रशासनाला हस्तांतरित केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट करून सांगितली आहे.

 

Related posts: