|Saturday, February 29, 2020
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स निफ्टी समपातळीवर बंद, मिडकॅप मध्ये तेजी

सेन्सेक्स निफ्टी समपातळीवर बंद, मिडकॅप मध्ये तेजी 

मुंबई / वृत्तसंस्था      :

आशियाई बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारांची सुरूवात तेजीने झाली. मात्र मोठ्य़ा साप्ताहिक सुट्टीपूर्वीच्या दिवसभराच्या व्यवहारात मर्यादित कारभार नोंदवत बाजार सपाट बंद झाला. सेन्सेक्स 105 अंकाच्या वधारासह 31,676 अंकावर खुला झाला. तर निफ्टी 29 अंकाच्या तेजीसह 9881 च्या स्तरावर उघडला.

सेन्सेक्स 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 28.05 अंक वधारून 31,596.05 अंकावर स्थिरावला. तर निफ्टी 4.55 अंक अर्थात 0.05 टक्के नाममात्र वाढीसह 9857.05 च्या पातळीवर सपाट बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी दिसून आली. बीएसएईचा मिडकॅप निर्देशांक 0.8 अंक वधारत बंद झाला. तर निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 0.6 अंकाची वाढ दिसून आली. बंद होताना बीएसईच्या स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची बळकटी आली.

बँकिंग, एफएमसीजी, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू आणि कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू समभागांवरती दबाव दिसून आला. बँक निफ्टी 0.2 टक्क्यानी घसरत 24,274 च्या स्तरावर विसावला. मात्र औषधे, धातू, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टीचा फार्मा निर्देशांक 3.3 टक्के, धातू निर्देशांक 0.5, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक 0.25 तर वाहनिर्मिती निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वधारले. बीएसईच्या पायाभूत वस्तू निर्देशांकांत 0.5 आणि ऊर्जा निर्देशांकात 0.25 टक्क्यांची बळकटी आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

दिग्गज समभागांचा विचार करता एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, एसीसी, बजाज ऑटो, बॉश, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि एचयूएल हे समभाग 1.4 ते 0.7 टक्क्यांनी घसरत बंद झाले. तर अरविंदो फार्मा, ल्यूपिन, सन फार्मा, डॉ रेड्डीज, सिप्ला आणि इंन्फोसिस हे समभाग 4.8 ते 2 टक्के वधारत बंद झाले.

स्मॉलकॅप समभागांमध्ये करियर पाइंट, एप्टेक, प्रकाश इंडस्ट्रीज, ग्लोबस स्पिरिट्स आणि इंट्रासॉफ्ट टेक हे समभाग 19 ते 11 टक्क्यांनी मजबूत झाले. तर सन फार्मा ऍडवांस्ड, एवायएम सिंटेक्स, फीनिक्स मिल्स, एमएसआर इंडिया आणि इंडियन टेरेन 7.4 ते 4.25 टक्क्यांनी घसरत बंद झाले. 

 

 

Related posts: