|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनी तीन दिवसात 20 टक्क्यांनी वधारले

उजनी तीन दिवसात 20 टक्क्यांनी वधारले 

पंढरपूर :

सोलापूर जिल्हय़ाची वरदायिनी असणाऱया उजनी धरण सत्तरीच्या उंबरठयावर येउन ठेपले आहे. यामधे दौंड येथून उजनीमध्ये अद्यापही विसर्ग सुरू आहे. पुणे येथे भीमा खोऱयात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीची स्थिती तीन दिवसामध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वधारली आहे.

तीन दिवसापूर्वी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी उजनी धरण अवघ्या 44 टवक्मयांवर होते. त्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली. अशामधेच भीमा नदीच्या खोऱयात आणि उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाने हजेरी लावली. अशामध्येच उजनीमध्ये मोठया क्षमतेने दौंड येथून विसर्ग येण्यास सुरूवात झाला होता. यामध्ये सुरूवातीला दौंड येथून तब्बल 70 हजार क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये सुरू होता. त्यामुळे उजनीची पाणी पातळी वधारण्यास सुरूवात झाली. अशामध्ये 22 ऑगस्ट रोजी उजन<ाr धरण 55 टक्के भरले होते. त्यानंतर दौंड येथून सुमारे 50 हजारांच्या आसपास विसर्ग प्रवाहीत होतच होता. 23 ऑगस्ट रोजी उजनी धरण सुमारे 64 टक्क्यांवर येऊन ठेपले होते.

त्यानंतर गुरूवारपर्यत उजनीमध्ये तब्बल 10 हजार क्युसेकचा विसर्ग हा दौंड येथून प्रवाहीत करण्यात आलेला होता. त्यामुळे उजनी धरण हे आज 67 टक्क्यांवर येउन पोहोचलेले दिसून आले.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनी धरणाची पाणी पातळी लवकर आणि चांगलीच भरलेली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात उजनी धरण मायनस मधून प्लस आलेले होते. यंदा ऑगस्ट महिन्यामधे उजनीने पन्नाशी गाठली होती. अशामधेच कालवा आणि नदीला पाणी सोडल्यामुळे उजनीची पाणी पातळी 6 टक्क्यांनी कमी झाली होती. अशामधेच राज्यात कुठे पाऊस नव्हता. त्यामुळे उजनी पूर्ण क्षमतेने भरणार? की यंदा दुष्काळाशी समाना करावा लागणार? असे प्रश्न उपस्थित झालेले होते.