|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चितारी यांच्यासह आठजणांना अटक

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चितारी यांच्यासह आठजणांना अटक 

प्रतिनिधी/ कागल

गणेशाची आरती करुन प्रसाद वाटपाप्रसंगी कटकारस्थान, जमाव जमवून मारहाण करुन विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बसवराज चितारी यांच्यासह सातजणांविरोधात कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शाहू कॉलनी येथील विवाहितेने कागल पोलिसांत दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चितारीसह सातजणांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शाहू कॉलनीत हिंदवी स्वराज्य मित्रमंडळ व श्रीमंत जयसिंगराव घाटगे  मित्र मंडळ ही दोन मंडळे आहेत. या मंडळांचा शुक्रवारी रात्री 8 वाजता आरतीचा कार्यक्रम झाला. यानंतर या मंडळांचे कार्यकर्ते व नागरिक प्रसाद घेत होते. त्याचवेळी हसन मुश्रीफ युवा मंचचे कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीतून येत होते. यावेळी त्यांच्या मोटरसायकलीस जाण्यासाठी रस्ता नव्हता. कांही उपस्थित महिलांनी त्यांना रस्ता करुन दिला. त्यानंतर दहा मिनिटांनी हीच मुले पुन्हा त्याठिकाणी काठय़ा घेवून आली. पालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मंडळामुळे संजय चितारी यांचा पराभव झाल्याचे म्हणत त्यांनी जयसिंगराव घाटगे मित्र मंडळाचा डिजीटल फलक फाडला. याचा जाब विचारण्यासाठी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते गेले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादीसह कांही महिला तेथे गेल्या. त्यावेळी प्रणित चितारी याने फिर्यादीच्या कानफाडात मारुन धक्काबुक्की केली. जल्ला उत्पन्न होईल असे कृत्य करुन ढकलून दिले. त्याचवेळी संकेत चितारी याने हातातील काठीने दुसऱया एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी त्याठिकाणी येवून तुम्हाला मस्ती आलीया असे म्हणत विनायक सुर्यवंशी व दिपक निंबाळकर यांना काठिने मारहाण करत बघून घेण्याची धमकी दिली.

याबाबत संबंधित महिलेने  कागल पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी संजय बसवराज चितारी, संकेत संजय चितारी, प्रणित संजय चितारी, अजय विजय बेडगे, अभिजीत तानाजी बाबर, अरिफ रमजान नायकवडी, महेश भगवान कांबळे यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.

– इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक

Related posts: