|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » फासावर जाईन पण भाजपशी हातमिळवणी नाही : लालूप्रसाद यादव

फासावर जाईन पण भाजपशी हातमिळवणी नाही : लालूप्रसाद यादव 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :                  

मी एक वेळेस फासावर जाईन पण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आजवर जनतेची फक्त दिशाभूलच केली, असेही ते म्हणाले.

भाजपविरोधी रॅलीत लालूप्रसाद बोलत होते. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. मोदी सरकारने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. निवडणुकांपूर्वी ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले गेले होते. मात्र, अच्छे दिन कुठे आले आहेत, जर आले असतील तर ते कोणाला आले आहेत, असा सवालच लालूंनी केला.

Related posts: