|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मंगेश तळवणेकर यांच्याकडून 842 कुटुंबांना धान्य वाटप

मंगेश तळवणेकर यांच्याकडून 842 कुटुंबांना धान्य वाटप 

ओटवणे : गेली सलग 24 वर्षे गणेशोत्सवानिमित्त माजी सभापती मंगेश तळवणेकर हे गरीब कुटुंबांना धान्य वाटप करतात. यंदाही तळवणेकर यांनी तांदुळ, तेल, नारळ, बटाटे, कापूर, अगरबत्ती, साखर, तुरडाळ आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कालिकामंदिर कारिवडे, सावंतवाडी येथे त्यांनी केले. तळवणेकर हे वर्षभर वहय़ा वाटप, गणवेश वाटप, रक्तदान शिबिरे इत्यादीसारखे उपक्रम राबवत असतात.

धान्य वाटप करताना मंगेश तळवणेकर, लक्ष्मण गावकर, महादेव कारिवडेकर, अरविंद कारिवडेकर, अमोल कारिवडेकर, शंभा खडपकर, मनोहर गुरव, मंगेश पंदारे, न्हानू परब, नारायण ठाकुर, महेश कारिवडेकर, दाजी शेटकर, नारायण राणे, शंभा जाधव, भिकाजी जाधव, सुरेश मेस्त्राr, अजित सकपाळ आदी उपस्थित होते. यावर्षी 842 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.