|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » ई व्यापार कंपन्यांविरोधात सरकारकडे सर्वाधिक तक्रारी

ई व्यापार कंपन्यांविरोधात सरकारकडे सर्वाधिक तक्रारी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ग्राहकांकडून केंद्र सरकारला ई व्यापार कंपन्यांविरोधात सर्वाधिक तक्रारी मिळाल्या आहेत. भारतीय गुणवत्ता मंडळाचा अहवाल पंतप्रधान कार्यालय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जारी केला.

ई व्यापार कंपन्यांविरोधात सर्वाधिक तक्रारी वस्तूच्या गुणवत्तेविषयी व योग्य प्रकारे मार्गदर्शक नियमावली नाहीत, रिफंड करण्यासाठी योग्य प्रणाली नसणे, डिलीव्हरी आणि एक्स्चेंज पॉलिसी योग्य नसणे अशा तक्रारी आहेत. या ठिकाणी किंमत आणि डिस्काऊंटसंदर्भात कोणत्याही नियमावली नाहीत आणि ग्राहक सेवा दर्जाहीन असते अशा तक्रारी आहेत. या ठिकाणी विक्री होणाऱया वस्तूंची गुणवत्ता तपासण्यात येत नाही असा आरोप आहे. सर्वाधिक तक्रारी असणाऱया कंपन्यांची यादी सार्वजनिक करण्यात यावी. यामुळे त्यांच्या कामकाजात सुधारणा होईल असे अहवालात म्हणण्यात आले.

पर्यावरण मंत्रालयाला सर्वाधिक तक्रारी अवैध गोहत्या प्रकरणी मिळाल्यात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला सर्वाधिक तक्रारी सेट टॉप बॉक्सप्रकरणी मिळाल्या आहेत. या तक्रारी नेटवर्क नसल्याच्या संदर्भात आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाला सर्वाधिक तक्रारी एअर इंडियाविरोधात मिळाल्या आहेत. 2016 मध्ये केंद्र सरकारच्या 88 मंत्रालय आणि विभागाला 12 लाख तक्रारी मिळाल्या होत्या. मागील वर्षाच्या तुलनेत त्या 8.7 लाख अधिक होत्या. तक्रारींची मूळ समस्या सोडविण्यासाठी आणि त्यामध्ये घट करण्यासाठी सरकार प्रस्ताव मांडण्याचा अभ्यास करत आहे, असे मंडळाने म्हटले.