|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दक्षिण वादळी वाऱयांमुळे नौका देवगड बंदरात

दक्षिण वादळी वाऱयांमुळे नौका देवगड बंदरात 

प्रतिनिधी/ देवगड

समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमारी नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. स्थानिक नौकांसह रत्नागिरी, मुंबई, गुजरात येथील सुमारे शंभरहून अधिक नौकांचा यात समावेश आहे. ताशी 45 ते 60 कि. मी. वेगाने दक्षिण वारे वाहत असून मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मच्छीमारी बंदी कालावधी संपल्याने 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मच्छीमारी सुरू झाली. सध्या किनाऱयालगत सहा ते सात वावामध्ये काही प्रमाणात कोळंबी मिळत असल्यामुळे रत्नागिरी, मालवणसह स्थानिक नौका मच्छीमारी करीत होत्या.  सुमारे 32 वाव अंतरामध्ये म्हाकूल व बळा मिळत असल्याने मुंबई व गुजरात येथील नौका मच्छीमारी करीत होत्या. मात्र, मंगळवारी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने या सर्व नौका सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात आल्या आहेत.

Related posts: