|Monday, August 19, 2019
You are here: Home » Automobiles » लग्झरी कार महागणार ; करात 10 टक्क्यांनी वाढ

लग्झरी कार महागणार ; करात 10 टक्क्यांनी वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लग्झरी आणि एसयूव्ही कारप्रेमींना सरकारने मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने लग्झरी कारच्या करात 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे लग्झरी कारच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले, अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने केंद सरकारला कर वाढवण्याबाबत कायद्याचा विचार करावा, यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावानुसार, एसयूव्ही कारचा 15 टक्के असणारा कर 10 टक्क्यांनी वाढून 25 टक्क्यांवर गेला आहे. या नव्या करामुळे लग्झरी आणि एसयूव्ही कारच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.