|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपूर, शिरोळातील सहा हॉटेलवर छापे : दीड लाखांची दारू जप्त

जयसिंगपूर, शिरोळातील सहा हॉटेलवर छापे : दीड लाखांची दारू जप्त 

जयसिंगपूर / प्रतिनिधी

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशावरून जयसिंगपूर व शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा हॉटेलवर धाड टाकण्यात आली. यामध्ये सुमारे दीड लाख रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.   ही कारवाई मंगळवारी पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने केली आहे.

 जयसिंगपूर पोलिस ठाण्याहद्दीतील सांगली-कोल्हापूर महामार्गावर हॉटेल विजय धाबा येथे केलेल्या कारवाईत 62 हजार 926 रूपयांची तर हॉटेल लँडमार्क मधील 28 हजार 263 रूपयांची व शिरोळ पोलिस हद्दीतील हॉटेल प्रिया येथे 17 हजार 25 रूपयांची तर हॉटेल जय मध्ये 23 हजार 798 रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत हॉटेल विजयचे भिकाजी गणपत चिंदके, हॉटेल लँडमार्कचे गंधर्व राघवेंद्र राव, हॉटेल प्रियाचे अनिल राजाराम माने-गावडे व हॉटेल जय चे अंकुश अण्णासाहेब खटके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 याशिवाय जयसिंगपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सांगली-कोल्हापूर रोडवरील हॉटेल पुष्पराजमध्ये 3 हजार 460 रूपयांचा बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला. इकबाल अल्लाबक्ष नदाफ याला ताब्यात घेण्यात आले. तर शिरोळ पोलिसांनी बायपास रोडवरील हॉटेल वरद वर धाड टाकून माजी उपनगराध्यक्ष कल्याणसिंग बाबूसिंग रजपूत यांना ताब्यात घेतले. तेथे 10 हजार  182 रूपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संदिप मेटके यांच्या पथकाने केली. यामध्ये अमोल घोरे, अमृत खेडकर, प्रविण पाटील, अनिल माने, पांढूरंग खोंद्रे, बाळराजे घाडगे, बालाजी नागरबोजे यांचा समावेश होता. रात्री उशीरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.