|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » मुंबईत 5 मजली इमारत कोसळली ; 21 जणांचा मृत्यू

मुंबईत 5 मजली इमारत कोसळली ; 21 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मुंबईतील जे जे मार्ग परिसरात 5 मजली इमारत कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण अडकल्याचे भीती वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या 10 गाडय़ा घटनास्थळी पोहोचले आहेत.

जे जे जंक्शन येथील पाकामोडिया स्ट्रीटवर सकाळी आठच्या सुमारास 5 मजली निवासी इमारत कोसळली . या दुर्घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबे राहत होती.दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. ढिगाऱयाखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जे जे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मतदकार्यासाठी घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही रवाना झाल्याचे समजते. ही इमारत 100 ते 125 वर्षे जुनी असल्याचे स्थानिक नगरसेवक आतूल शहा यांनी एका वृत्तलाहिनीला सांगितले.