|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अवैध मच्छीमारीवर आजपासून पोलीस संरक्षणात कारवाई

अवैध मच्छीमारीवर आजपासून पोलीस संरक्षणात कारवाई 

मत्स्य आयुक्त गोविंद बोडके यांची माहिती

कारवाईसाठी घेणार पोलिसांच्या स्पीड बोटीची मदत

आजपासून पर्ससिननेट मच्छीमारीला प्रारंभ

प्रतिनिधी /रत्नागिरी

समुद्रात होणारी अवैद्य मासेमारी व परराज्यातील मच्छीमारांचे होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी मत्स्य विभाग पोलिसांची मदत घेणार असल्याचे सूतोवाच आठवडाभरापूर्वी रत्नागिरीत आलेल्या सहाय्यक मत्स्य आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मच्छीमारीलाही प्रारंभ होत आहे. त्यामुळे या कारवाईला 1 सप्टेंबरपासून पोलिसांच्या स्पीड बोटी व संरक्षणात कारवाईला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

समुद्रातील मच्छीमारीसाठी कोणताही परवाना नसताना अनेक मच्छीमार अवैद्य मासेमारी करत असतात. या बेकायदा होणाऱया मासेमारीवर अनेकदा येथील मत्स्य आयुक्त विभागामार्फत कारवाईचा बडगा उगारला जात असतो. तरीही या बेकायदा मासेमारीवरील कारवाईकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे येथील मच्छीमारांमधूनही वेळोवेळी ओरड केली जात असते. या चालणाऱया अवैद्य मासेमारीवर वचक ठेवण्यासाठी मत्स्य विभागाने हे पाऊल उचलले असल्याचे बोडके यांनी सांगितले होते. पारंपारिक मासेमारीवरील बंदी ऑगस्टमध्येच उठली आहे. त्यामुळे या मासेमारी हंगामाला प्रारंभ झालेला आहे. मात्र खराब वातावरणाचा या मासेमारी हंगामाला फटका बसला आहे.

आजपासून 1 सप्टेंबर पासून पर्ससिननेट मच्छीमारीला प्रारंभ होत आहे. त्यामुळे समुद्रातील पारंपारिक व पर्ससिननेट मच्छीमार यांच्यात मासेमारीसाठी चढाओढ वाढणार आहे. यापूर्वी पारंपारिक व पर्ससिननेट मच्छीमार यांच्यातील संघर्ष बंदी उठवण्यावरून व शासनाच्या निर्बंधावरून घडलेला आहे. मच्छीमारांमधून होणारे कारवाईसंदर्भातील आरोप व त्या अनुषंगाने अवैद्य मच्छीमारीवर प्रतिबंध घालण्यासाठी ‘स्पीड बोटी’चा पर्याय उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ओह. या अवैद्य चालणाऱया मासेमारीवर कारवाई करण्यासाठी मत्स्यविभाग सक्षम असल्याचे मानले जाते. पण या विभागातील रिक्त पदे व अद्ययावत साधनसामुग्रीच्या मर्यादा कारवाईच्या मोहिमेत अडथळे बनत आहेत. त्यासाठी पोलिसांची सागरी गस्तीसाठी मदत घेतली जाणार आहे. पोलिसांच्या ‘स्पीड बोटी व संरक्षणात कारवाईला प्रारंभ करणार असल्याचे बोडके यांनी सांगितले.

Related posts: