|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑर्डिनेन्स फॅक्टरीच्या 13 अधिकाऱयांची हकालपट्टी

ऑर्डिनेन्स फॅक्टरीच्या 13 अधिकाऱयांची हकालपट्टी 

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

देशाच्या सुरक्षा गरजेनुसार पुरेसा दारूगोळा निर्मिती न करण्याप्रकरणी टीकेच्या धनी ठरलेल्या दारूगोळा कारखान्यांच्या (ऑर्डिनेन्स फॅक्टरी) 13 वरिष्ठ अधिकाऱयांना सरकारने कामावरून कमी केले. संरक्षण मंत्रालयात पहिल्यांदाच अशाप्रकारची कारवाई झाली. प्रशासकीयदृष्टय़ा ऑर्डिनेन्स फॅक्ट्री संरक्षण मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन अंतर्गत येतात.

या कारखान्यांचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी इंडियन ऑर्डिनेन्स फॅक्ट्रीज सर्व्हिसची स्थापना करण्यात आली. यात यात ग्रुप ए केंद्रीय सेवेचे कर्मचारी सामील असतात. सूत्रानुसार 39 कारखान्यांच्या जवळपास 1 लाख कर्मचाऱयांचे नेतृत्व 1718 अधिकारी करत आहेत. 50 वर्षांच्या वयानंतर या अधिकाऱयांची क्षमता नव्याने मूल्यांकन करण्याची तरतूद आहे. सशस्त्र दलांना त्यांच्या गरजेनुसार दारूगोळा आणि इतर सामग्री मिळावी यासाठी कारखान्यांना सज्ज ठेवण्याची पूर्ण जबाबदारी या अधिकाऱयांवर असते. सशस्त्र दलांना निश्चित कालावधीत गुणवत्तायुक्त उत्पादने मिळावीत याची जबाबदारी अधिकाऱयांना देण्यात आली आहे. याची क्षमता सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली जात असल्याचे सरकारने सांगितले.