|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » विविधा » देशाच्या विकास दरात 2.2 टक्क्यांनी घसरण

देशाच्या विकास दरात 2.2 टक्क्यांनी घसरण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशाचा विकास दर 2.2 टक्क्यांनी घसरल्याची माहिती मिळाली आहे. एप्रिल – जून 2017या काळात देशाच्या विकास दरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गेल्या वर्षी याच काळात देशाचा विकास दर 7.9 टक्के एवढा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासदर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे.

उत्पादन क्षेत्रात घट झाल्यामुळे विकाश दरात मोठी घसरण झाली.तर एप्रिल- जून या काळात सेवा क्षेत्रातील विकास दराचे आकडे समाधानकारक आहेत. देशातील महत्त्वाच्या 8 क्षेत्रांचा विकास दर जुलैमध्ये 2.4 टक्क्यांवर घसरला आहे. एका वर्षापूर्वी याच 8 क्षेत्रांचा विकाश दर 3.1 टक्के एवढा होता. अर्थव्यवस्थेच्या या 9 महत्वाच्या क्षेत्रांचा विकास दर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या विका दरावर पडला. दरम्यान नोटाबंदीमुळे देशाचा विकास दर घटला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतरची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जुन्या 99 टक्के नोटा बँकेत जमा झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. ज्यावरून देशातील राजकारण तापले आहे.

 

Related posts: