|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी डॉ. काफिल खानला अटक

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी डॉ. काफिल खानला अटक 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकिय महाविद्यालयात गेल्या महिन्या झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिल खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ात फक्त सहा दिवसांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला होता. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी ऑक्सिजन थांबवण्यात आल्याने 30 मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रूग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपलया खासगी रूग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.

या धक्कादायक घटनेनंतर डायरेक्ट जनरल ऑफ मेडिकल एज्युकेशन के के गुप्ता यांनी 23 ऑगस्ट रोजी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव राजीव कुमार यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट सादर केला होता. यानंतर वैद्यकिय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर यांना पदावरून हटवण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रूग्णालयाच्या प्रचार्यांसह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.