|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वेर्लेकरांच्या पुस्तकामुळे जीएसटी विषयी महिती मिळणार

वेर्लेकरांच्या पुस्तकामुळे जीएसटी विषयी महिती मिळणार 

प्रतिनिधी/ पणजी

 चार्टड ऍकांऊंटट व्ही. बी प्रभू वेर्लेकर यांनी आपल्या पुस्तकातून जीएसटीविषयी साध्या व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. याचा सर्वसामान्य लोकांना तसेच व्यावसायिकांना लाभ होणार आहे. जीएसटीमध्ये सर्व कायदे नियम त्यांनी आपल्या  पुस्तकातून मांडले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 केंद्र सरकारने लागू केलेले एक राष्ट्र एक कर हे सर्वासाठी चांगले आहे. काही लोकांना जीएसटी अजून काय ते माहीत नाही त्यामुळे लोकांना या दिवशी माहीती करुन देणे गरजेचे आहे. या पुस्तकाच्या आधारे सगळी माहिती मिळणार आहे. या पुस्तकाचा गोव्याच्या आर्थिक माहितीसाठीही लाभ होणार आहे. तसेच सर्व कर धारकांनाही या पुस्तकाचा फायदा होणार आहे. वेरेकर यांनी या पुस्तकातून जीएसटीतील सर्व गोष्टी उलघडले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना या पुस्तकामुळे जीएसटी काय आहे हे कळणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.

 गोव्यातील जीएसटी कायदा विषयक हे पहिले पुस्तक आहे. त्यामुळ आता गोव्यात जीएसटीचा वापर चांगल्या प्रकारे होणार आहे. गोव्यातील काही दुकानावर हे पुस्तक  विक्रीस ठेवण्यात आले आहे. यामध्ये देवकी पब्लीकेशन (08322223812) नागेश बुक ऐजन्सी प्रोफेशनल बुक पणजी ऍण्ड पार्ले एजन्सी गोल्डन हार्ट इंम्पोरियम मडगांव येथे हे पुस्तक विक्रीस ठेवण्यात आले आहे.

Related posts: