|Thursday, November 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » फारुखाबाद : 49 मुलांच्या मृत्यूनंतर सरकारची कारवाई

फारुखाबाद : 49 मुलांच्या मृत्यूनंतर सरकारची कारवाई 

फारुखाबाद

 उत्तरप्रदेशच्या फारुखाबाद येथील जिल्हा रुग्णालयात 30 दिवसांमध्ये 49 नवजात मुलांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि लोहिया जिल्हा रुग्णालयाचे सुप्रिटेंडेंट यांची बदली करण्यात आली. सरकारने ही कारवाई याप्रकरणाचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतर केली. तिन्ही अधिकाऱयांसमवेत काही जणांविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला. या 49 मुलांचा मृत्यू 21 जुलैपासून 20 ऑगस्टदरम्यान झाला होता. जिल्हाधिकाऱयांनी चौकशीचा आदेश दिला होता. तज्ञांचे पथक पाठवून याप्रकरणाची चौकशी करविली जाईल असे सरकारने सांगितले.

 20 जुलै ते 21 ऑगस्टदरम्यान जिल्हा रुग्णालयात 468 जणांचा जन्म झाला. यातील 19 मुलांचा जन्मानंतर लगेच मृत्यू झाला होता. तर 66 गंभीर प्रकृती असणाऱया बाळांना नवजात उपचार केंद्रात दाखल करण्यात आले, ज्यातील 60 मुलांची प्रकृती सुधारली तर 6 मुलांना वाचविण्यास अपयश आले. याशिवाय 145 नवजातांना वेगवेगळ्या रुग्णालयातून येथे पाठविण्यात आले होते. यातील 121 नवजात उपचारानंतर बरे झाले. 20 जुलै ते 21 ऑगस्टदरम्यान 49 नवजातांचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले.

चौकशीचे आदेश

जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी या प्रकरणी चौकशीसाठी 30 ऑगस्ट रोजी पथक स्थापन केले आणि 3 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. बहुतेक मुलांचा मृत्यू ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे झाल्याचे चौकशीत आढळले. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱयाने जिल्हाधिकाऱयांसमवेत इतरांची दिशाभूल केल्याचे चौकशीत दिसून आले.

Related posts: