|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ग्रामसेवकांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू

ग्रामसेवकांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद हेरवाडे (वय 33) यांचा स्वाईन फ्लू ने सोमवार 4 रोजी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हेरवाडे यांच्या निधनाने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून तालुक्याला अद्याप स्वाईन फ्लू कक्ष नसल्याने आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

शिरोळ तालुक्यातील मूळचे दत्तवाड चे रहिवासी असणारे विनोद हेरवाडे हे गेल्या चार वर्षांपासून धरणगुती ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक म्हणून रुजू होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी ग्रामसेवक हेरवाडे यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान डॉक्टरांना झाल्या नंतर त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील के.एल.ई. मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी पहाटे उपचारा दरम्यान हेरवाडे यांचा मृत्यू झाला.  दुपारी दत्तवाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. 

चौकट – तालुक्यात स्वाईन फ्लू

शिरोळ तालुक्यातील पहिला शासकीय कर्मचाराचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात स्वाईन फ्लू चे तपासणी केंद्र का नाही? या बाबत नागरिकातून विचारणा होत असून आरोग्य विभाग बेफीकीर कसा? याबाबत तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

Related posts: