|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » ‘लालबागचा राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ

‘लालबागचा राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेली 12 दिवस आपल्या लाडक्या गणरायाची पूजा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी सर्वच भाविक भावनिक होत असतात. यातच मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

गणेश विसर्जनासाठी येणाऱया भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी तब्बल 8604 पालिका अधिकारी आणि कर्मचाऱयांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला असून, गणेश विसर्जनासाठी भाविकांनी समुद्रात उतरु नये, यासाठी 50 जर्मन तराफे सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच पोलीस प्रशासनाकडून आवाहनही करण्यात आले आहे.