|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

पितृपक्ष महालय-पितरांचे स्मरण पूजन

बुध. 6 ते 12 सप्टेंबर 2017

जिवंत असताना यानी आमच्यासाठी काय केले, यानी आमचा भयंकर छळ केला, आमची इस्टेट लुबाडली, खोटी कागदपत्रे करून जबरदस्तीने सहय़ा घेऊन जमिनी हडपल्या, जीवनात भ्रष्टाचार करून पुंजी जमवली, खोटेनाटे सांगून अनेकांची जुळणारी लग्ने मोडली, नोकरीत चांगल्या माणसावर अन्याय केला, सासुने सुनेचा अपरीमित छळ केला तर सुनेने सासूला वाऱयावर सोडले, आया बहिणींची अब्रू लुटली, सतेचा व अधिकाराचा गैरवापर करून लोकांचा छळ केला, श्रीमंतीच्या गुर्मित अनेकांच्या मालमत्तेवर नजर ठेवून त्या लुबाडल्या, अशा लोकांचे श्राद्ध कशाला करायचे अशी भाषा कुठे ना कुठे ऐकू येत असते. वास्तविक त्यात काहीही चुकीचे नाही म्हणून जी चांगली वाईट कृत्ये करतो ती या ना त्या स्वरुपात या जन्मी अथवा पुढील जन्मी भोगावी लागतात. पुण्याई जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याची झळ जाणवत नाही. पण पापाचे घडे भरत  आले की ते स्वत:ला किंवा पुढील अनेक पिढय़ांना भोगावे लागते. शापीत स्वरुपात या ना या रुपात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. गेलेल्या माणसांविषयी वाईट बोलू नये पण त्यानी केलेली कृष्णकृत्ये लोक विसरत नाहीत. भाद्रपद कृष्ण पक्ष हा महिना खास या तृप्त, अतृप्त आत्म्यांसाठी राखून ठेवलेला आहे. ज्ञात तृप्त अतृप्त पितरआत्मे या महिन्यात पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतात. प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ज्यांची जी तिथी असेल त्या त्या तिथीला सर्वाचे पितर भूतलावर अवतिर्ण होत असतात. या सर्वात महत्त्वाच्या तिथी म्हणजे कृष्ण चतुर्दशी व अमावास्या या होत. त्रासून गेलेल्या खून, आत्महत्या, दुर्घटना, जाळपोळ, गळफास, विषप्रयोग, दंगल, गोळीबार, दगडाने ठेचून  मारणे. अग्नितांडव जलप्रलय पाण्यात बुडून गेलेल्या अशा असंख्य दुर्घटनेत गेलेल्या व्यक्तीचे आत्मे कृष्णचतुर्दशीला भूतलावर अवतरतात. या दोन दिवसातील वातावरण अत्यंत नैराश्यपूर्ण व अतिशय बाधिक असते. या अमावास्येला सर्व पितर झाडून या भूतलावर अवतरतात. नोकरी उद्योग, व्यवसाय व इतर कारणांमुळे ज्यांना संबंधित तिथीला श्राद्ध  करणे जमत नसेल, त्यानी या पितृपक्षात अथवा सर्वपित्री अमावास्येला तरी ते जरुर करावे. काही जणांच्या मागे श्राद्ध करणारे कुणीही नसतात व असले तरी श्रद्धा नसल्याने ते करतीलच याची शाश्वती नसते. श्राद्ध पक्ष हे सारे झूट आहे आम्हाला ते पटत नाही, ही फक्त लुबाडणूक करण्याची आयडीया आहे. एकदा माणूस गेला की गेला त्याचे ऋणानुबंध संपले. त्याच्यासाठी श्राद्धकर्म केले म्हणजे ते त्याला पोचते याची खात्री कोण देणार? अशी भाषाही काही जण वापरतात. हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा आहे. आपल्या घराण्यातील पूर्वज कोठे तरी जन्माला आले असतीलच मग त्यांचे श्राद्ध कशाला करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर्कवादाच्या दृष्टिकोनातून ते बरोबरही असेल. पण तरीही पितरांचे श्राद्ध सोडू नये. ते कोपल्यास अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मुलाबाळांच्या आरोग्य व प्रगतीवर अनिष्ट परिणाम होतो. लग्ने होत नाहीत. हुषार असूनही चांगली नोकरी मिळत नाही. नोकरी व्यवसाय डबघाईला येतात नंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काही लोक जागे होतात. हे सारे दोष सर्वपित्री अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने नष्ट होऊ शकतात.

श्राद्ध हा एक शास्त्राsक्त विधी आहे. शास्त्राsक्त मंत्रोच्चाराने त्यांना आवाहन करून त्यांची पूजाअर्चा करून मग त्यांना सन्मानाने परत पाठविले जाते. या पितृपक्षातील शास्त्राsक्त श्राद्धविधीने पितर शांत होऊन कुटुंबियांना शांतता, समृद्धी, भाग्योदय यांचा आशीर्वाद देतात. त्यासाठी न चुकता या अमावास्येला ज्ञात अज्ञात पितरांचे श्राद्ध जरूर करावे. कृष्ण चतुर्दशी व सर्वपित्री अमावास्या हे दोन दिवस अतिशय बाधिक असल्याने या दोन दिवसातच सर्वाधिक बाधा होतात. ज्यांना श्राद्ध करणे जमत नसेल त्यांनी निदान पितृपीडानिवारक स्तोत्राचे 11, 21 किंवा108 पाठ या अमावास्येला वाचावेत व कावळे व इतर मुक्मया प्राण्यांना काही तरी खाऊ घालावे त्याचाही चांगला उपयोग होईल.

.

मेष

आठ तारखेला चतुर्थात येणारा राहू आगामी दीड वर्षापर्यंत काही बाबतीत त्रासदायक तर काही बाबतीत अतिशय उत्तम फळ देईल. घराण्यातील पूर्वजांचे श्राद्धकर्म व्यवस्थित होत असेल, तसेच पितर शांत असतील तर या राहूची शुभफळे मिळतील. आर्थिक परिस्थितीत बरेच चढउतार जाणवतील. या राहूचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी राहती वास्तु स्वच्छ व पवित्र ठेवा.


वृषभ

पराक्रमात येणारा राहूचा प्रभाव आगामी दीड वर्षापर्यंत राहील. प्रखर शत्रू नांगी टाकतील. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल. मुली, बहिणी, आत्या, संतती व भावंडे यांच्या बाबतीत जरा त्रासदायक. कितीही अडथळे आले तरी अवघड कामे पूर्ण होतील. सरकारी कामात यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत फार जपावे लागेल. अपघात वगैरेची शक्मयता. हस्तीदंत वस्तू जवळ बाळगल्यास फायदा होईल.


मिथुन

धनस्थानी येणारा राहू दीड वर्षे प्रभावशाली असल्याने कितीही हुशार असाल तरी काही गंभीर चुका हातून होतील. सुवर्ण, पैसा अडका, पती, पत्नी व जमीन या संबंधीत भांडणतंटय़ात अडकणार नाही याची काळजी घ्या. पोलीस केसेस व कोर्ट प्रकरणे यापासून दूर रहा. शस्त्रास्त्रे, हत्यारे यापासून सावध राहणे आवश्यक. पण आर्थिक बाबतीत हा राहू काही अडचण पडू देणार नाही. स्वतंत्र व्यवसाय असेल तर सावध राहणे फार आवश्यक.


कर्क

तुमच्या राशीतच येणारा राहू दीड वर्षापर्यंत मानसिक समाधान बिघडविण्याची शक्मयता आहे. 42 च्या पुढे वय असेल तर या राहूचा अनिष्ट परिणाम जाणवणार नाही. विजेच्या वस्तू, तसेच काळे, निळे कपडे खरेदी करू नका. कामात धारसोडवृत्ती जाणवेल. कोणालाही कर्ज देऊ नका. अथवा काढू नका. उसने पैसे दिल्यास ते नक्की अडकतील. सरस्वती उपासना केल्यास राहूचा दुष्परिणाम कमी होईल.


सिंह

बाराव्या स्थानी होणारे राहूचे आगमन आगामी अठरा महिने सर्व बाबतीत सावध राहण्यास सुचवीत आहे. कौंटुंबिक सुखसमाधान, झोप,आराम आणि वैवाहिक सौख्यावर त्याचा अनिष्ट परिणाम जाणवेल. डोळय़ांची काळजी घ्यावी. कोर्ट प्रकरणापासून दूर रहा. पूर्व जन्मातील देणे म्हणून काही जणासाठी मोठा खर्च करावा लागेल. निरवंशी इस्टेट मिळण्याची शक्मयता असल्यास ती घेऊ नका.


कन्या

आठ तारखेपासून पुढील दीड वर्षापर्यंत राहूच्या सर्व कार्यांत मोठे यश मिळेल. इस्टेटीच्या बाबतीत घोटाळे माजतील. आर्थिक बाबतीत शुभकाळ असला तरी वडिलधारी माणसे, सुवर्ण यांच्या बाबतीत अनिष्ट परिणाम जाणवतील. कोर्टबाजी करू नका. तसेच मित्र व बहीण भावंडे यांच्या संसारात खळबळ माजून त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. बदनामी व अफवापासून सावध राहणे आवश्यक.


तूळ

दशमात येणारा राहू सर्व बाबतीत शुभ आहे. मानसन्मान, पैसा अडका, नोकरी व्यापारी उद्योगात यश अशी उत्तम फळे मिळतील. राजकारणात असाल तर एखादे मोठे पद मिळण्याची शक्मयता. कुटुंबात जर वादावादी, मतभेद, संशयीवृत्ती तसेच जुन्या वस्तुंचे प्रमाण अधिक असेल तर इस्टेटीवर कर्ज काढण्याचा प्रसंग येईल. काळजी घ्या. या राहूच्या कालखंडात विहीर, बोअरवेल, हौद किंवा टाकीचे बांधकाम करू नका. पुढे अडचणी निर्माण होतील.


वृश्चिक

भाग्यात येणारा राहू दीड वर्षापर्यंत प्रभावी राहिल. नास्तिक वृत्ती वाढेल. आदर व प्रति÷ा यांना धक्का पोहचेल. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी  घ्यावी. भावंडे व मातापित्यांशी चुकूनही वादविवाद करू नका. कर्जापासून दूर रहा. अंमली पदार्थाचे व्यसन व आजारपण यापासून मनस्ताप होईल. आंतरजातीय विवाह व प्रेमप्रकरणापासून दूर राहणे आवश्यक. आगामी दीड वर्षापर्यंत काळे व निळे कपडे वापरू नका. अथवा कोणी दिल्यास स्वीकारू नका.


धनु

अष्टमस्थानी होणारे राहूचे आगमन सर्व बाबतीत सावध राहण्यास सुचवित आहे. महत्त्वाच्या कामात अडथळे, वादविवाद फालतु खर्च, आर्थिक फसवणूक व अचानक दुर्घटना अशा गोष्टी घडण्याची शक्मयता असते त्यासाठी सावध राहणे आवश्यक. अनैतिक मार्गाने पैसा मिळत असेल तर तो स्वीकारू नका. बाधिक वस्तू व स्थळे यापासून दूर राहणे आवश्यक. पूर्वजांची पुण्याई चांगली असेल तर मोठय़ा प्रमाणात धनलाभही होऊ शकेल.


मकर

आठ तारखेपासून राहू सप्तमात येत आहे. वैवाहिक जीवनात नाटय़मय घटना. आर्थिक चणचण, व्यवसाय व व्यापारात मंद प्रगती असे अनुभव येतील. मित्र मंडळीपासून आर्थिक बाबतीत सावध राहणे योग्य ठरेल. सट्टा, लॉटरी, मटका व रेस यापासून दूर रहा. वडील व सासरे यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. देवा धर्माच्या नावाखाली बळी देण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा संतती व ऐश्वर्यावर परिणाम होईल.


कुंभ

या आठवडय़ात राहू सहावा येत असून पुढील दीड वर्षापर्यंत सर्व तऱहेने चांगली फळे देईल. परदेश प्रवासाचे योग येतील. तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्याच्या जीवावरचे संकट टळेल. ऐषआरामाची साधने उपलब्ध होतील. जीवनात महत्त्वाचे फेरबदल घडतील. नको त्या व्यक्ती आयुष्यात येतील. त्यामुळे आर्थिक हानी, बदनामी व नामुष्कीचे प्रसंग येतील. कोर्ट कचेरीत अपेक्षित यश मिळेल.


मीन

पंचमात येणारा राहू शापित दोष निर्माण करील. संतती सौख्य व शिक्षणात अडथळे येतील. मानसिक स्थिती संभ्रमीत राहील. सरकारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाकडून अडचणी निर्माण होतील. विवाह ठरविताना फार जपावे लागेल. कुटुंबातील शापित दोष डोके वर काढण्याची शक्मयता. हा शापीत योग असल्याने शक्मयतो कोणाचे मन दुखावू नका. अन्यथा किरकोळ बाबी उग्रस्वरुप धारण करतील व त्याचा पुढे प्रगतीवर परिणाम होईल.

 

Related posts: