|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » सोनिया गांधींच्या जनपथवरील बंगल्यातून एसपीजी कमांडो बेपत्ता

सोनिया गांधींच्या जनपथवरील बंगल्यातून एसपीजी कमांडो बेपत्ता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एसपीजी कमांडो मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. या बातमीनंतर सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.

हा एसपीजी कमांडो सोनिया गांधेच्या सरकारी निवासस्थन 10 जनपथमध्ये तैनात होता आणि तो 3 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. तुघलक रोड पोलिस या कमांडोचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप त्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हा एसपीजी कमांडो वर्दी घालून 10 जनपथवर दाखल झाला, त्या दिवसी तिथे त्याची डय़ूटीही नव्हती. डय़ूटी नसतानाही सरकारी वर्दीत सोनिया गांधींच्या निवास्थानी पोहोचल्यानंतर तो गायब कसा झाला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिस आता एसपीजी कमांडोशी संबंधित माहिती मिळवत आहेत.

 

Related posts: