|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पालपेणमध्ये गव्याने केली काजू बाग उद्ध्वस्त

पालपेणमध्ये गव्याने केली काजू बाग उद्ध्वस्त 

पालपेणे-कुंभारवाडीतील लागते तब्बल 40 वृक्ष टाकले उखडून, रमेश खैर यांच्या काजूबागेचे मोठय़ाप्रमाणात नुकसान

प्रतिनिधी /गुहागर

तालुक्यात गुहागर, मोडकाआगर, वरवेली, पालशेत, पालपेणे या परिसरात गव्याच्या उच्छादाने शेतकरी हैराण झाला असून पालपेणे-कुंभारवाडी येथील रमेश विश्राम खैर यांच्या काजूबागेतील तब्बल 40 झाडे गव्याने उद्ध्वस्त केली आहेत. परिणामी रमेश खैर यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील गुहागर, मोडकाआगर, वरवेली, पालशेत या परिसरात सातत्याने गवे पहावयास मिळत आहेत. हे गवे मोडकाआगर येथील जंगलातून पालपेणे जंगलात गेले असून येथील बागायतीची मोठय़ाप्रमाणात नुकसान करत आहेत. पालपेणे येथील रमेश खैर यांची पालपेणे-कुंभारवाडी येथे लागती काजू बाग आहे. गेल्या दोन वर्षापासून या बागेतून काजूचे उत्पादन काढण्यात येत आहे. या बागेला चिरे डालून बंदिस्ती करण्यात आली आहे. मात्र या महाकाय गव्याने दगड उडवून बागेत प्रवेश करून बागेतील तब्बल 40 काजूची झाडे मोडून तसेच उखडून उद्ध्वस्त केली आहेत. तसेच या बागेत पावसाळय़ात काकडी व चिबुडाची लागवड करण्यात आली होती. यामुळे सुमारे 100 ते 125 काकडी-चिबुडही उद्ध्वस्त करून टाकले आहेत. येथील परिसरात गेल्या काही वर्षापूर्वी भुईमुंगाच्या शेंगा मोठय़ाप्रमाणात केल्या जात होत्या. मात्र रानटी जनावरांमुळे शेतकऱयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी अनेकांनी भुईमुंगाच्या शेंगांचे उत्पादन घेणे बंद केले आहे. यातच या परिसरात आंब्यापेक्षा काजूचे उत्पादन चांगले आहे. आपल्या मोकळय़ा माळरानावर अनेकांनी काजुबागा फुलवल्या आहेत. मात्र अशाप्रकारे गव्याने काजुबागा उद्ध्वस्त करावयास सुरूवात केल्याने बागायतदार हैराण झाले आहेत.

Related posts: