|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » एक्साईड लाईफ इन्शुरन्सची पीएमसीसोबत भागिदारी

एक्साईड लाईफ इन्शुरन्सची पीएमसीसोबत भागिदारी 

प्रतिनिधी/ मुंबई

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकच्या (पीएमसी) ग्राहकांना अधिक सुरक्षित सेवा देण्यासाठी एक्साईड लाईफ सोबत भागिदारी केली केली आहे. देशभरात महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेशात पीएमसी एक महत्त्वपूर्ण बँक आहे. मागील 32 वर्षात बँकेने 6 राज्यात 127 शाखा सुरू करून विस्तार केल्याने एक्साईड लाईफ इन्शुरन्सच्या ब्रँडची लोकप्रियता

वाढेल व कंपनीच्या विमा क्षेत्रातील सक्षम स्थानामुळे बँकेला ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

दरम्यान, एक्साइड लाइफ इन्शुरन्स आणि कंपनीच्या विशेष विमा योजनांशी सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागीदारीमुळे आम्ही अधिक मूल्य देऊ शकू आणि बचत व गुंतवणूक उत्पादनांमध्ये वाढ करू शकू. तसेच, ग्राहकांना वैविध्यपूर्ण उत्पादने देऊ शकू, असे पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी सांगितले.