|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे

जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे 

जळगाव / प्रतिनिधी :

जळगावच्या महापौरपदी ललित कोल्हे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने जळगाव शहरावर आपली सत्ता असल्याचे याद्वारे दाखवून दिले. भाजपा विरोधी पक्ष असतानाही त्यांनी आपला उमेदवार दिला नव्हता.

जळगाव महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्यास वर्षभराचा कालावधी बाकी आहे. महापालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक सदस्य असून, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, यांनी आघाडीला पाठिंबा देत भाजपाला एकटे पाडले आहे. 75 पैकी 11 सदस्य मनसेचे आहेत. मागील 4 वर्षांपासून मनसेने खान्देश विकास आघाडीला पाठबळ दिल्याने अखेर महापौरपदासाठी मनसेच्या ललित कोल्हे यांना संधी देण्यात आली. गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली असता ललित कोल्हे यांचा एकमेव अर्ज महापौरपदासाठी आला असल्याने ही निवड बिनविरोध झाली.

पुरेशा संख्याबळाअभावी भाजपाकडून उमेदवार नाही

जळगाव जिल्हय़ात जिल्हा बँक ते दूध फेडरेशनपर्यंत सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात असताना जळगाव महापलिका भाजपाला जिंकता आलेली नाही. अन्य पक्षांनी महापालिकेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे पसंत केले. त्यामुळे आज पुरेसे संख्याबळ पाठीशी नसल्याने पक्षाने उमेदवार दिला नाही.

Related posts: