|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » …तर मोबाईल क्रमांक होणार कायमचा बंद

…तर मोबाईल क्रमांक होणार कायमचा बंद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोबाईल क्रमांक आधारकार्डशी जोडण्यासाठी कंपनीकडून अनेकदा मेसेज अथवा कॉल येत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक न केल्यास संबंधित मोबाईलधारकाचे सिमकार्ड बंद करण्यात येणार आहे.

खोटी कागदपत्रे देऊन सिमकार्ड घ्यायचे आणि ते गुह्यांसाठी वापरायचे. त्यानंतर ते फेकून द्यायचे असे प्रकार सर्रासपणे होत आहेत. असा वापर दहशतवाद्यांकडून झाल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे यावर सरकारने गंभीर विचार केला असून, कोणत्याही सिमकार्ड युजर्सला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासाठी सरकारकडून फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व मोबाईल युजर्सनी आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी जोडून त्याचे व्हेरिफिकेशन करुन घ्यावे, असे न झाल्यास संबंधित मोबाईलधारकाची सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.