|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » …म्हणून नितीशकुमार भाजपला शरण : लालूप्रसाद यादव

…म्हणून नितीशकुमार भाजपला शरण : लालूप्रसाद यादव 

ऑनलाईन टीम / भागलपूर :

सृजन घोटाळा प्रकरणात तुरुंगात जाण्याच्या भीतीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडी तोडून भाजपला शरण गेले, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर केली.

ते म्हणाले, नितीशकुमार यांना खुर्चीचा मोह सुटत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरच त्यांना प्राण सोडायचा आहे. तसेच सृजन घोटाळ्याची कुणकुण दिल्लीत भाजपला लागली होती. त्यामुळे त्यांनी अलिखित असा धमकीवजा संदेश नितीशकुमार यांना दिला होता. या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागेल, असा संदेश दिला होता. याच भीतीपोटी नितीशकुमार भाजपला शरण गेले, असा दावा लालूप्रसाद यांनी केला.