|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » चीनमध्ये पेट्रोल, डिझेल कारवर बंदी ?

चीनमध्ये पेट्रोल, डिझेल कारवर बंदी ? 

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनमध्ये पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करण्यात येत आहे. चीनने यासाठी संशोधन सुरू केले असून बंदीसाठी लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे चीनच्या उद्योग राज्यमंत्र्याने म्हटले. चीनच्या कार उद्योगामध्ये बदल करण्यासाठी नवीन धोरण राबविण्यात येत आहे. चीनने पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱया कारवर बंदी घातल्यास त्या देशातील वाहन उद्योग संकटात येईल. जगात विक्री होणाऱया तीन कारपैकी एक कारची निर्मिती ही चीनमध्ये होते. पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाऱया कारमुळे हवा प्रदूषण आणि कार्बनचे उत्सर्जन होत असल्याने त्याचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

चीनमध्ये इलेक्ट्रिक कारच्या वापराला प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2020 पर्यंत 12 टक्के कार या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड प्रकारातील असाव्यात यासाठी उत्पादकांकडून नवीन प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या देशातील चिनी सरकारच्या मालकीच्या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग प्लग लावण्यास सांगण्यात आले आहे. वोल्वो या चिनी कंपनीने 2025 पर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक वाहने विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Related posts: