|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळ येथे 22 रोजी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया

कुडाळ येथे 22 रोजी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया 

प्रतिनिधी / कुडाळ : 

 बॅ. नाथ पै यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (कुडाळ) आणि जिल्हय़ातील सर्व डॉक्टर्स, कुडाळ मेडिकल असोसिएशन, स्त्राrरोगतज्ञ संघटना, डीएफसी यांच्या सहकार्याने 22 व 23 सप्टेंबर रोजी येथील डॉ. नंदन सामंत यांच्या दवाखान्यात लहान मुलांच्या शस्त्रक्रिया बालरुग्ण शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक करणार आहेत. लहान मुलांच्या हार्निया, हायड्रोसिल, अनडिसेंडेड टेस्टीज, बायपसिज, हायपोस्पॅडिअज या आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. हे आजार असणाऱया व शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणाऱया मुलांच्या पालकांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग), दू. क्र. (02362) 221207 येथे संपर्क साधावा. शस्त्रक्रिया डॉ. संजय ओक करणार आहेत. ते बालरुग्ण शल्य चिकित्सक आहेत. 23 रोजी डॉ. संजय ओक यांची प्रकट मुलाखत बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम व देवदास मटाले घेणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व संयोजक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे.