|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजप अध्यक्ष अमित शाह यांना नरोडा दंगल प्रकरणी समन्स

भाजप अध्यक्ष अमित शाह यांना नरोडा दंगल प्रकरणी समन्स 

अहमदाबाद

2002 सालच्या नरोडा दंगलीप्रकरणी सुनावणी करत असलेल्या विशेष एसआयटी न्यायालयाने मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी समन्स बजावले. विशेष एसआयटी न्यायाधीश पी.बी देसाई यांनी कोडनानी यांच्या अर्जावर शाह यांना 18 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचा निर्देश दिला. न्यायालयाने शाह आणि अन्य काही जणांना आपल्या बचावार्थ साक्षीदार म्हणून हजर राहण्याकरता समन्स जारी करण्याची कोडनानी यांची विनंती मान्य केली होती. गुन्हा घडला त्यावेळी विधानसभेतील कामकाजात सहभागानंतर सोला नागरी रुग्णालयात गेल्याचे सांगत कोडनानी यांनी त्यावेही शाह देखील तेथे उपस्थित असल्याचा दावा केला.

 साबरमती रेल्वे जळीतकांडात मारले गेलेल्या कारसेवकांचे मृतदेह गोध्रा येथून त्याच रुग्णालयात आणले गेले होते.

अहमदाबादच्या नरोडा येथील नरसंहार 2002 च्या 9 मोठय़ा सांप्रदायिक दंगलींपैकी एक असून त्याची चौकशी विशेष तपास पथकाने केली होती.