|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » मुंबईच्या 19 वर्षाखालील संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश

मुंबईच्या 19 वर्षाखालील संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश 

वृत्तसंस्था/ मुंबई

बडोदा येथे 16 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या जे.वाय. लेले चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघामध्ये सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन याचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी मुंबईचा 18 जणांचा संघ निवडण्यात आला आहे. यामध्ये 17 वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई संघामध्ये अग्नी चोप्रा, डी सक्सेना, भुपेन लालवाणी, अंजदीप लाड, सागर छाब्रिया, शोएब खान, एस. जैन, वेदांत मुरकर, ध्रृव ब्रिद, टी.कोटियान, नकुल मेहता, एफ काझी, अर्थव अंकोलेकर, अभिमन्यू वशिष्ठ, एस. पराशर, एस.झा. एस. डिसोझा यांचा समावेश आहे.

Related posts: