|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पूर्णगड दुर्घटनेतील दोन खलाशांचेही मृतदेह सापडले

पूर्णगड दुर्घटनेतील दोन खलाशांचेही मृतदेह सापडले 

मंगळवारपासूनच्या शोधकार्याला मिळाला पूर्णविराम

वार्ताहर /पावस

पुर्णगड मच्छिमार बोट ‘आयशाबी’ दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या उर्वरित दोन मच्छिमारांचे मृतदेह बुधवारी शोध लागला. दोन्ही खलाशांचे मृतदेह स्थानिक व तटरक्षकदलाच्या शोधकार्याअंती हाती लागले आहेत. त्यामुळे या घटनेत चारही खलाशांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील पूर्णगड गावातील चार मच्छिमारांवर ओढवली. मच्छिमारीसाठी गेलेले तीन सख्खे भाऊ व त्यांचा एक सहकारी अशी चौघेजण छोटी नौका (बलाव) उलटल्याने समुद्रात बुडाले. त्यातील दोघांचे मृतदेह हाती लागले होते. पूर्णगड येथील एकाच कुटुंबातील जैनुद्दीन लतिफ पठाण (वय 45), हसन लतीफ पठाण (लय 65) , अब्बास लतीफ पठाण (वय 42) आणि तवकर अब्दुल सत्तार बांगी (वय 32) या चौघाजणांचा बुडालेल्यांमध्ये समावेश आहे. यामध्ये हसन पठाण व जैनुद्दीन पठाण या दोघांचे मृतदेह मिळुन आले होते. 11 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 ते 1.45 च्या दरम्यान समुद्रात ही घटना घडली होती.

नौका उलटल्याने चौघेही पाण्यात बुडाले होते. पाण्यात बुडालेल्यांचा शोधकार्यात त्यांच्यापैकी हसन लतीफ पठाण ; जैनुद्दीन लतीफ पठाण या दोघांचे मृतदेह मिळून आले होते. बेपत्ता अब्बास लतीफ पठाण व तवक्कल अब्दुल सत्तार बांगी यांचे मृतदेह मिळणे बाकी होते. बुधवारी या दोघांचे मृतदेह मिळून आले. हे मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.