|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘बिद्री’साठी 67 अर्ज अवैध, 772 वैध

‘बिद्री’साठी 67 अर्ज अवैध, 772 वैध 

प्रतिनिधी/ सरवडे

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल 839 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची आज निवडणूक निर्णय अधिकाऱयांमार्फत छाननी करण्यात आली. त्यामध्ये 67 उमेदवारी अर्ज अवैध तर 772 अर्ज वैध ठरले आहेत. अवैध ठरलेल्या अर्जामध्ये गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिनकर कोतेकर, हमिदवाडय़ाचे माजी संचालक आनंदराव फराकटे, माजी पं. स. सदस्य आर. के. मोरे, प्रताप पाटील, तेजस्वीनी पाटील यांचा समावेश आहे. संस्था, इतर मागास व भटक्या विमुक्त जाती गटातील सर्व अर्ज वैध ठरले आहेत.

 बिद्रीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली. तीन दिवसांत तब्बल 1260 उमेदवारी अर्जांची विक्री होऊन 839 अर्ज दाखल झाले. त्या अर्जांची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी सभागृहात छाननीची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली. छाननीत अर्ज वैध की अवैध ठरणार हे पाहण्यासाठी अर्जदारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रारंभी उत्पादक गटवार छाननी करण्यात आली. 7 गट क्रमांकाची छाननी करण्यासाठी सुमारे तीन तास वेळ लागला. दुपारी दोननंतर इतर राखीव गटाच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये ज्या अर्जदारांनी तीन वर्ष कारखान्याला ऊस पुरवठा केलेला नाही, गटातीलच सुचक-अनुमोदक दिलेला नाही, अर्जाबरोबर डिपॉझिट पावती सादर केली नाही, तसेच सहकारी संस्थेत थकीत असल्याच्या कारणांवरून अवैध ठरविण्यात आले. त्या अर्जदारांना आपली भूमिका मांडण्यास वेळ देण्यात आला होता. अर्जदारांचे म्हणणे ऐकूण निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी वैध-अवैधचा तत्काळ निर्णय जाहीर केला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related posts: