|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » व्हॅन-जीप अपघातात चौघे जखमी

व्हॅन-जीप अपघातात चौघे जखमी 

प्रतिनिधी/ फोंडा

धारबांदोडा येथे मारुती व्हॅन आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातात दोन लहान मुलांसह चौघेजण जखमी झाले. धारबांदोडा-कोडली जंक्शनजवळ मोले-बेळगाव महामार्गावर काल बुधवारी सायं. 4.30 वा. हा अपघात झाला.

या अपघातात व्हॅनचालक गंगाराम केसरेकर (35, रा. साईनगर, तिस्क उसगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याची दोन लहान मुले किरकोळी जखमी झाली आहेत. याच व्हॅनमधील कुळेच्या माजी सरपंच किरण मामलेकर याही जखमी झाल्या आहेत. जखमी गंगाराम व किरण मामलेकर यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. गंगाराम केसरेकर हा मूळ कॅसलरॉक येथील असून तो आपल्या गावाकडे जाण्यासाठी जीए 05 डी 6059 या क्रमांकाच्या व्हॅनमधून तिस्क उसगावहून मोलेच्या दिशेने निघाला होता. वाटेत धारबांदोडा येथे बससाठी थांबलेल्या किरण मामलेकर यांना त्यांनी लिफ्ट दिली. त्या मोले येथे उतरणार होत्या. धारबांदोडा-कोडली जंक्शनजवळ पोचले असता गंगाराम याचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरुन जाणाऱया जीए 12 टी 0289 या क्रमांकाच्या जीपगाडीला व्हॅनची धडक बसली. या धडकेमुळे व्हॅनच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. त्यात गंगाराम व किरण मामलेकर यांना गंभीर दुखापत झाली तर गंगारामची दोन मुले किरकोळ जखमी झाली. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.