|Monday, March 30, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » कशी असेल देशातील पहिली बुलेट ट्रेन?

कशी असेल देशातील पहिली बुलेट ट्रेन? 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

देशातील पहिल्या अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. बुलेट ट्रेनमुळे भारताच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पहिली बुलेट ट्रेन कशी असेल ?

सध्या बुलेट ट्रेनला 10 डब्बे असतील, ज्यामध्ये सुमारे साडेसातशे प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकतील. दररोज एका बाजुने 35 ट्रेन धावतील दररोज जवळपास 36 हजार प्रवासी प्रवास करतील. सध्या या बुलेट ट्रेनचे तिकीट 2700 ते 3000 रूपये असणार आहे.

  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल
  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून ,351 किमी गुजरातमधून आहे.
  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.
  • वांद्र, ठाणे,विरार, बाईसर,वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स.
  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता
  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेने पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात.
  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल.सर्व स्टॉप घेतले तरर हे अंतर दोन तास 58 मिनिटांत पार होणार आहे.
  • एकूण एक लाख 8 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे.

 

 

Related posts: