|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अवघ्या सात मिनिटात हृदय पोहोचले विमानतळावर

अवघ्या सात मिनिटात हृदय पोहोचले विमानतळावर 

सोलापूर / प्रतिनिधी :

येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातून गुरुवारी कर्नाटकातील बसवकल्याणच्या एका मुलाचे हृदय व यकृत काढून त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी तातडीने पुण्याला पाठविण्यात आले. अवघ्या सहा मिनिटे 54 सेकंदात ह्रदय व यकृत घेवून ऍम्बुलन्स सोलापूर विमानतळावर पोहोचली. तर इतर काही अवयव ऍम्बुलन्सद्वारे महामार्गाने पुण्याकडे रवाना झाले. हे सोलापुरातील ऐतिहासिक असे दुसरे यशस्वी ग्रीन कॉरिडोर होते.

कर्नाटकातील बिदर जिह्यातील बसवकल्याण येथील युवक ओंकार अशोक महिंदकर (वय 21) या रिक्षाचालकाचा मंगळवार 12 सप्टेंबर रोजी बसवकल्याण येथे कंटेनरच्या धडकेने अपघात झाला होता. या अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला तर जखमी ओंकारला मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी उमरगा येथे नेण्यात आले. पुढील उपचारासाठी ओंकार यास सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बुधवारी पहाटे साडेचार वाजता त्याच्या आई-वडिलांनी दाखल केले. बुधवारी रात्री साडेदहा वाजता शासकीय रुग्णलयातील डॉक्टर्सनी ओंकारचे बेनडेड झाल्याची कल्पना त्यांच्या पालकांना दिली. पोटचा गोळा डोळ्यासमोर मृत्यूशी झगडत असतानाच ब्रेनडेड झाल्याने तो अवयवरुपी तरी या जगात जिवंत रहावा, या उदात्त हेतूने ओंकारच्या पालकांनी त्याचे अवयवदान करण्याची तयारी दर्शवली.

यानंतर अवयवदानाची तयारी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्सनी सुरु केली आणि पोलिसांना कळविण्यात आले. बुधवारी मध्यरात्रीनंतर ग्रीन कॉरिडोरच्या तयारीला सुरुवात झाली. जीवंत व्यक्तीचेच अवयवदान करता येत असल्याने मृत्यूशी झुंजणाऱया ओंकारला जीवंत ठेवण्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करीत ओंकारचे ह्रदय चालू ठेवले. ह्रदय, यकृतासह किडनी, डोळे आदी महत्वाचे अवयव यशस्वीपणे प्रत्यारोपणासाठी पाठविता यावेत यासाठी पुण्याहून विशेष वैद्यकीय पथकास बोलविण्यात आले.

Related posts: